Ad will apear here
Next
‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’
मुंबई : ‘जनधन योजनेच्या माध्यमातून मोठे काम हाती घेण्यात आले असून, गरिब, आदिवासी लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले; तसेच ज्यांना घर नाही अशा १२ लाख कुटुंबांपैकी चार लाख कुटुंबांना घर देण्यात आले आहे. २०१९पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला घर दिले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन जव्हार (पालघर) येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यातील मंत्री पंकजा मुंडे, विष्णू सावरा, उमेदवार राजेंद्र, खासदार, आमदार यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘पिण्यासाठी, शेतासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आधीपासूनच काम हाती घेण्यात आले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून समृद्धी आणि विकास साधला जातो आहे. महाराष्ट्रात पाणी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हातात घेण्यात आली आहे, त्याचप्रमाणे इथल्या प्रत्येक गावाला पाणी मिळण्याच्या दृष्टीने आराखडा तयार काम सुरू आहे. २०१९च्या डिसेंबरपर्यंत पात्र सर्व आदिवासींना मालकी हक्काचे पट्टे दिले जातील. फळबागांच्या लागवडीसाठी विविध योजनेत निधीही दिला जाणार असून, रोजगारासाठी आदिवासी लोकांची होणारी भ्रमंती थांबवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील.’

‘स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेने कधीही पाठीत वार केला नाही; मात्र ज्यांच्या रक्तात कमळ आणि भाजप आहे त्यांचेच कुटुंब फोडण्याचे काम शिवसेनेने केले,’ असे टीकास्त्रही मुख्यमंत्र्यांनी यांनी या वेळी सोडले. ‘अश्रूंचे राजकीय भांडवल करायचे नसते. ही जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही. अश्रू पुसायचेच होते, तर तुम्हाला तीन मेची का वाट पहावी लागली,’ असा प्रश्नही सभेदरम्यान फडणवीस यांनी उपस्थित केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZMKBO
Similar Posts
शैक्षणिक, सामाजिक संघटनांचा भाजपला पाठिंबा पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध समाजघटक भाजपच्या विचारधारेशी जोडले जात आहेत. पालघरसारख्या आदिवासीबहुल भागासह राज्याच्या विविध भागात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
सुट्टीच्या दिवशी भाजपचा मतदारांशी थेट संपर्क पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार (१९ मे) भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत सार्थकी लावला.
आठवलेंनी घेतली फडणवीस यांची भेट मुंबई : सन २०११पर्यंतच्या झोपड्यांना कायदेशीर अधिकृत मान्यता द्यावी, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये ४०० स्क्वेअर फुटांचे घर देण्यात यावे, या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली
‘मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या’ मुंबई : ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे,’ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language